Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
From the Publisher
इकिगाई : दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य
वाचकांसाठी… इकिगाईचे पाच स्तंभ
या पुस्तकामध्ये मी पानोपानी इकिगाईच्या पाच स्तंभांचा उल्लेख केला आहे. ते पाच स्तंभ असे आहेत :
स्तंभ 1 : लहान प्रमाणात प्रारंभ…
स्तंभ 2 : स्वमुक्ती…
स्तंभ 3 : सुसंवाद आणि शाश्वती…
स्तंभ 4 : छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद…
स्तंभ 5 : इथे आणि आता… या क्षणी…
या स्तंभांची भेट वारंवार होते, कारण प्रत्येक स्तंभ हा इकिगाईचा पाया भक्कम करणारा, त्यावर सुंदर वास्तू उभी करणारा आधारस्तंभ आहे. इकिगाईची सर्वार्थाने भरभराट होण्यासाठी आवश्यक असे हे स्तंभ आहेत. ते एकमेकांना पूरक अथवा मारक नाहीत. त्यांच्यामध्ये कोणतेही अनुक्रम किंवा स्तर ठरलेले नाहीत; पण इकिगाई समजण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढील पानं वाचताना, त्यातील अर्थ समजून घेताना हे स्तंभ तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. प्रत्येक वेळी त्यांचा नवा आणि अधिकाधिक सखोल अर्थ उलगडत जाईल.
हा शोधप्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरेल अशी आशा आहे.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या :
कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…
Attitude Is Everything: Change Your Attitude. Life! Drushtikon Mhanjech Sarvakahi
जेव्हा तुम्ही तुमच्या यशास पाठबळ मिळेल अशा पद्धतीने विचार करता, बोलता आणि तशी कृती करता, तेव्हा तुम्ही यशाची दारे खऱ्या अर्थाने सर्व बाजूने ठोठावत असता… आणि जीवनातील तुमच्या अपूर्व अशा यशाच्या मार्गाने वाटचाल करीत असता.
तुम्ही अशा प्रवासाचा आरंभ करीत आहात की, जो तुम्हाला स्वप्नवत असलेले यश आणि आनंद मिळवून देणार आहे, तर मग चला प्रवासास सुरुवात करू या….
या पुस्तकात प्रामुख्याने लेखकाला स्वत:ला आलेले नैराश्य पळवून लावण्यासाठी त्याने केलेले जोरदार प्रयत्न आणि कालांतराने त्यावर केलेली मात हे खरोखरीच विलक्षण असून, इतरांना प्रेरणात्मक ठरणारी अशीच बाब आहे.
‘‘हे पुस्तक पूर्णत: मनोवृत्ती या विषयावर आधारित आहे. या इंग्रजी पुस्तकाबद्दल येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, वेळोवेळी आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस नमूद केलेली उदाहरणे, किस्से हे खूपच खुमासदार आणि मार्मिक असे आहेत. मनुष्याच्या जीवनात दृष्टिकोन किती महत्त्वपूर्ण काम करतो, हे पदोपदी लक्षात येते. ‘दृष्टिकोन म्हणजेच सर्वकाही’ आणि ‘तुमच्या दृष्टिकोनात बदल करा… आणि तुमचे जीवनच बदलेल!’ या दोन्ही उक्ती किती सार्थ आहेत, हे पुस्तक वाचताना लगेच पटते. ’’
– डॉ. मोहन उचगावकर
द़ृष्टिकोन ही एक निवड आहे!
‘‘सन 1985 मध्ये, नकारार्थी विचार मनात ठेवून, निराश होऊन मी एकटाच माझ्या अभ्यासिकेत बसलो होतो. वकिलीच्या माझ्या व्यवसायात मी आतून जळून खाक झालो होतो आणि मला तसूभरही कल्पना नव्हती की, ही परिस्थिती मी कशी बदलू शकेन. मला काही ध्येय नव्हती…स्वप्नं नव्हती…माझ्यात ऊर्जाच नव्हती. नंतर मी असा एक शोध लावला की, ज्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली.
मला सकारात्मक दृष्टिकोनाच्या सामर्थ्याचा शोध लागला.
जसा मी माझा दृष्टिकोन बदलला तसं मला पूर्ण जगच नव्याने खुलं झालं. मी एवढा उल्हसित झालो होतो की, व्यक्तिगत विकासाच्या तत्त्वांचा मी सखोल अभ्यासच करायला सुरुवात केली. यशाच्या ज्या तत्त्वांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले, त्यासंबंधीची माहिती इतरांना देण्याची मोठी स्वप्ने मी उराशी बाळगायला सुरुवात केली होती. सन 1992 मध्ये, हे स्वप्न अमलात आणायचे मी ठरविले आणि मी माझी वकिली थांबवून, प्रेरणात्मक व्याख्यान देणारा वक्ता आणि लेखक म्हणून कारकीर्द करायचे ठरविले. तुमच्या स्वत:च्या आयुष्यात आमूलाग्र बदल करून आणण्याचे आणि यश व पूर्तता याबाबतची नवी उंची गाठण्याचे सामर्थ्य तुमच्यात सुद्धा आहे. तुमची वृत्ती सकारात्मक…नकारात्मक…किंवा त्यादरम्यान कुठेही असली तरी हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यावर कसे नियंत्रण ठेवायचे याबाबत मार्ग दाखवेल आणि तुमच्या अविश्वसनीय पात्रतेला वाट करून देईल.
या पुस्तकातील 12 प्रकरणे शिकून आणि ती अंगीकारून तुम्ही चैतन्यमय व्हाल…तुम्ही नवीन शक्यता पडताळून पहायला सुरुवात कराल…तुमच्या विलक्षण गुणवत्तेला विकसित करण्यासाठी तुम्ही कृतिशील व्हाल…आणि तुम्ही असामान्य परिणाम साध्य कराल.
हे पुस्तक असे आहे की, जे तुम्हाला तुमची वृत्ती बदलायला आणि तुमच्या जीवनात बदल घडवून आणायला शिकवेल!’’
– जेफ केलर
ASIN : B09KRTJJCL
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 January 2021); (PH: 9881745605)
Language : Marathi
Paperback : 320 pages
Item Weight : 340 g
Dimensions : 20.8 x 13.8 x 1.7 cm
Country of Origin : India
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Marathi Book